Sushma Andhare :...म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केलं; सुषमा अंधारेंनी स्पष्टचं सांगितलं - विविध कारणांमुळे माझा शिवसेना प्रवेश
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली. अंधारेंच्या पक्ष प्रवेशानंतर चळवळीतील लोकांनी अंधारे यांच्यावर टीका केली असून कालपासून त्यांच्यावर समाज माध्यमातून काही लोकांकडून टीका होत आहे. तर काही लोकांकडून त्यांचे स्वागत देखील केले जात आहे. या सगळ्या बाबींवर सुषमा अंधारेंनी स्पष्टीकरण देत टीकाकारांना उत्तर दिले आहे.