Eknath Shinde : एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेला पोस्टरला शिवसैनिकांनी फासले काळे, पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - नाशिकमधील शिवसैनिकांनी सकाळी बंडखाेर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाेस्टरला अंडे मारत काळे फासले आहे. उपनगर येेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात हा पाेस्टर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावला हाेता. पोस्टरला काळे फासले जात असताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळ्या अक्षरात गद्दार असे शब्द लिहिले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे पडसाद नाशिकमध्ये पडसाद मिळाले उपनगर परिसरात योगेश म्हस्के या कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासले, शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले आहे. ( Shiv Sainiks tore down poster put up by Eknath Shinde supporters )
Last Updated : Jun 24, 2022, 6:08 PM IST