Samyukta Kisan Morcha: देशभरात शेतकऱ्यांची परिषद आयोजित करणार; संयुक्त किसान मोर्चाची घोषणा
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली/गाजियाबाद - संयुक्त किसान मोर्चाची आज रविवारी (दि. 23 जुलै)रोजी बैठक झाली. ज्यामध्ये राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह किसान मोर्चाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. ( Farmer leader Rakesh Tikait ) यादरम्यान किसान मोर्चाने घोषणा केली की, (SKM) संघटनेपासून फारकत घेतलेले बहुतेकजण किसान मोर्चासोबत परतले आहेत. त्याचवेळी ते म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जुलैपर्यंत देशभरात शेतकऱ्यांची परिषद आयोजित केली जाईल. ( Meeting of Samyukta Kisan Morcha ) याचवेळी विश्वासघात केल्याचा आरोप किसान मोर्चाने सरकारवर केला आहे. तसेच, अग्निपथ या योजनेलाही यावेळी विरोध करण्यात आला.