UP Sambhal obscene dance : रावणा समोर अश्लिल डान्स, आयोजकांवर गुन्हा दाखल - Sambhal Obscene dance viral video
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16575227-thumbnail-3x2-up111.jpg)
लखनौ : UP Sambhal obscene dance उत्तर प्रदेशातील संभलमध्ये रामलीलेच्या मंचावर अश्लील चाळे Obscenity religious platform करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धार्मिक व्यासपीठावरील अश्लीलतेचा व्हिडिओ व्हायरल Obscene dance on the stage of Ramlila Samiti झाल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्यामुळेच रामलीला मंचावरील अश्लील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 10 आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
श्री रामलीला समितीच्या मंचावर अश्लील नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संभल जिल्ह्यातील बहजोई येथील पुराणा बाजार येथे सुरू असलेल्या रामलीला समितीच्या व्यासपीठाचा हा व्हायरल व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. धार्मिक व्यासपीठावर कशाप्रकारे अश्लीलतेचा प्रचार केला जात आहे, हे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्धनग्न होऊन फिल्मी गाण्यांवर अश्लील डान्स केला जात आहे. ईटीव्ही भारत या व्हिडिओला दुजोरा देत नाही.
Last Updated : Oct 7, 2022, 1:28 PM IST