Rebel MLA Dilip Kesarkar Press : दिपक केसरकरांनी सांगितली शिवसेना आमदारांच्या बंडाची खदखदं, पाहा व्हिडिओ - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी (आसाम) - शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आताच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेऊन शिवसेनेच्या बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद ( Eknath Shinde Group press ) घेतली. युतीच्या काळात राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे पडलेल्या उमेदवार यांना मोठ्या प्रमाणात मान दिला जात होता. मात्र शिवसेना आमदारांसोबत दुजाभाव केला जात असतो. त्यांना योग्य प्रमाणात निधी दिला जात नाही. विकासकामे मंजूर केली जात नाहीत. अशी खदखदं ही दिपक केसरकरांनी शिवसेना आमदारांच्या मनात असल्याचे सांगितले आहे.