Eknath Shinde : जे काही सुखदुख आहे ते आपल्या सगळ्यांचे एक; बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना केला आपला नेता - Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी (आसाम) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबूक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेसह बंडखोर आमदारांना ( Rebel Maharashtra Shiv Sena MLAs ) परत येण्याचे आवाहन केले होते. महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुखासमोर मांडावी. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा, असे संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना आवाहन केले आहे. दरम्यान शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीमध्ये एकमताने आपल्या सर्वांचा नेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे जे सांगतील त्यापद्धतीने पुढील दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.