रवी जाधव यांच्या 'रंपाट' चित्रपटाचा ढिंच्याक' टीजर लाँच - ravi jadhav
🎬 Watch Now: Feature Video

दिग्दर्शक रवी जाधव यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचा आगामी चित्रपट 'रंपाट' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द अंगात असलेल्या मुलांची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.