Rana vs Shivsena : मातोश्रीबाहेरुन 92 वर्षीय आजीने राणा दाम्पत्यांना 'पुष्पा स्टाईल' दिला इशारा - पुष्पा स्टाईल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे समजल्यापासून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी (दि. 23 एप्रिल) सकाळपासूनच मातोश्री बाहेरही तसेच नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये एक 92 वर्षांच्या आजीही सहभागी झाल्या होत्या. राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करताना आजीबाईंनी थेट ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, आम्ही हिंदुत्व सोडलेल नाही. आम्ही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे आहोत. आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये आम्ही कडवट हिंदू आहोत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी त्यांना फोन करुन घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला.
Last Updated : Apr 23, 2022, 4:20 PM IST