एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे रॅली - अब्दुल सत्तार
🎬 Watch Now: Feature Video
सिल्लोड - महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला आता सुरूवात झाली आहे. रॅलीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे फोटो असलेले पोस्टर ही वापरण्यात आले आहे. मोठ्या संख्येने समर्थक याठिकाणी उपस्थित आहेत. अब्दुल सत्तार यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख देविदास पा. लोखंडे यांनी विविध सर्कल मधील कार्यकर्त्यांना केले आहे