पुण्यातील रस्ते ओस; जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद - कोरोना विषाणू अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर पुणे शहरांमध्ये या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. सकाळी सात वाजल्यापासून या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली असून पुणे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य आहेत. प्रमुख रस्त्यांवर चौकांमध्ये दररोज प्रचंड गर्दी आणि ट्राफिक असते आज मात्र, तिथे नीरव शांतता दिसत आहे. पुणे शहरातील जनता कर्फ्यूचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी....