Pune Ganapati Visarjan 2022: पुण्यात ढोल ताशाच्या गजरात दुसरा मानाचा गणपती तांबे जोगेश्वरीची विसर्जन मिरवणूक - Pune Tambe Jogeshwari Visarjan Miravnuk
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : ढोल ताशाच्या नादात सनई चौघड्याच्या वादनाने आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यातील मानाच्या पाच गणपतीसह सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला ( Pune Ganapati Visarjan 2022 ) सुरुवात झालेली आहे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर निर्बंध मुक्त विसर्जन मिरवणूक ( Visarjan Miravnuk ) होत असून उत्साह मोठा दिसत आहे.पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक सुरुवात झाली असून ज्याप्रमाणे भक्तिधन सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात त्याचप्रमाणे मोठ्या राजकीय पक्षाचे राजकीय नेते देखील आज पुण्यातील मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यात प्रामुख्याने बघायला गेले तर पुण्याच्या कसबा गणपतीची आरती विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते होऊन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे . राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, चंद्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्याचबरोबर नीलम गोरे अशा अनेक दिग्गजांची आज पुण्यातील मिरवणुकीमध्ये गणेशाचे दर्शन घेतलेला आहे. आणि आता उत्साहामध्ये गणेश मंडळाचे आहे ते मिरवणुकीच्या रस्त्यावरती लाईनला लागलेले आहेत पहिल्या कसबा गणपतीचे आता सुरुवात झालेली आहेच त्यात वाटोपाठ दुसरा मानाचा गणपती तांबे जोगेश्वरीची ही मिरवणूक ( Pune Tambe Jogeshwari Visarjan Miravnuk ) निघालेली आहे आणि मिरवणूक मार्गावरती प्रचंड असे उत्साही भक्तगण दिसत आहेत आणि लोकांमध्येही मोठा उत्साह आहे त्याचबरोबर राजकीय नेत्यांमध्ये मंडळांमध्ये सुद्धा यावर्षी प्रचंड उत्साह आहे एवढी गर्दी त्यापूर्वी कधीही झाली नसल्यास अनेक मंडळाचे पदाधिकारी यावेळेस सांगत आहेत त्यामुळे यावर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक ही असंख्य लोकांच्या साक्षीने होत आहे असेच सध्या तरी पुण्यातील मिरवणूक मार्गावरील चित्र आहे.