Bunker To Raj Bhavan Revolutionary Gallery : बंकर ते क्रांतीकारकांची प्रेरणा गाथा सांगणारी गॅलरी; पाहा Video - क्रांती गाथा गॅलरीचे उद्घाटन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते राजभवन येथील क्रांती गाथा गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी 75 वर्षे हा अनमोल ठेवा अनभिज्ञ राहील्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. क्रांती गाथा गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले त्या जागेवर यापूर्वी एक बंकर होते. या बंकरमध्ये 70 वर्षापूर्वी आपल्या क्रांतीकारकांना संपवण्यासाठी वापर करण्यात आला. त्याच बंकरमध्ये आज क्रांतीकारकांचे दालन तयार करण्यात आले. ही अभिनंदनीय बाब आहे. असे पंतप्रधान म्हणाले. क्रांती गाथा संग्रहालयात राज्यातील अनेक थोर क्रांतिकारकांचे पुतळे आणि प्रतिमा लावण्यात आल्या आहे तसेच त्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. नेमके हे बंकर ते क्रांती गाथा गॅलरी याचा प्रवास कसा ( Bunker To Raj Bhavan Revolutionary Gallery ) राहिला. पाहूया या व्हिडिओतून....