वजन कमी करण्यापेक्षा निरोगी राहण्यावर लोकांचा भर
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - लॉकडाऊन मध्ये वाढलेले वजन कमी करण्यासोबत डायट वर लक्ष देण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये बेकिंग आणि कुकिंगचा ट्रेण्ड होता, प्रत्येकजण नवनवीन पदार्थ बनवून खात होता. त्याचे दुष्परिणाम म्हणजे वजन वाढत गेले. डाएट केल्याने वजन कमी होऊन प्रतिकारशक्ती कमी होईल आणि कोरोना होईल हा गैरसमज होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक डाएटविषयी अधिक सजग होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी चांगल्या आहाराच्या सल्ल्यासाठी आहारतज्ज्ञांकडे धाव घेण्यास सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसत आहे, असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली आठवले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ज्यांना आधीपासूनच रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड आहे आणि कोरोना झाला तर आणखीन त्रास अशी भीती ज्यांना वाटत आहे, ते लोक निरोगी आहारशैलीकडे वळत आहेत. वाढत्या कोरोनाशी दोन हाथ करण्यासाठी, तसेच योग्य आहाराच्या सल्ल्यासाठी अनेक लोकांनी आहारतज्ज्ञांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये पोस्ट कोविड डाएड घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच 'क' जीवनसत्त्व मिळविण्यासाठी व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांचा नुसता भडिमार सुरू आहे. पण सध्याच्या काळात आंबा हे सर्वाधिक 'क' जीवनसत्त्व देणारे फळ आहे. त्याचबरोबर लिंबू, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आवळाही खाऊ शकता, असा सल्लाही डॉ. आठवले यांनी दिला आहे.