Chaining Captive Elephants : 55 वर्षाच्या रामबहादूर हत्ती आहे बंदिवासात, 'या' कारणाने ठेवतात साखळ्यांनी बांधून; पाहा Video - पन्ना व्याघ्र प्रकल्प
🎬 Watch Now: Feature Video
पन्ना : मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात ( Panna Tiger Reserve ) 55 वर्षांचा रामबहादूर हत्ती सध्या बंदिवासात आहे. हत्तीला बेड्या आणि जाड साखळ्यांनी बांधून ठेवले जाते. हत्तीने 4 जुलै रोजी सकाळी आपल्याच माहुत बुधराम रोटियाचा दाताने दाबून खून केला होता. या धक्कादायक घटनेनंतर हत्ती जंगलात पळून गेला. ज्याला खूप प्रयत्नांनंतर हिनौता हाथी कॅम्पजवळ शांत करून साखळदंडांनी बांधण्यात आले. फील्ड डायरेक्टर उत्तम कुमार शर्मा यांनी सांगितले की, "घटनेनंतर हत्ती अधिक आक्रमक आणि धोकादायक झाला आहे". त्यांनी सांगितले की, "छत्तीसगडच्या जंगलात वाढलेला हा हत्ती 1993 मध्ये पकडला गेला होता. त्यावेळी हत्तीचे वय सुमारे 25-26 वर्षे होते. तेव्हापासून महावत बुधराम या हत्तीची काळजी घेत होते. जगातील सर्वात वृद्ध वत्सला हत्तीवरही या हत्तीने दोनदा हल्ला केला होता. (Elephant who killed mahout arrested) (Elephant Rambahadur was caught) (Forest department tranquilize in fetters) (Elephant attacked his own Mahout)