देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटचे रुग्ण सापडत असतानाच आता गोव्यातही ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून ५ रुग्णांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे (Five patients have been admitted to the isolation ward on suspicion of being infected with omicron). हे सर्व रुग्ण रशियातून (Russia)आले असून, त्यांचे कोविड अहवाल पॉझिटिव्ह (Covid 19 Reports Positive) आले आहेत.पणजी- रशियातून नेव्हल मर्चंटच्या बोटीतून आलेल्या ५ परदेशी नागरिकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या पाचही जणांना मुरगाव येथे विलीगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. (Five patients have been admitted to the isolation ward on suspicion of being infected with Omicron). त्यांचे कोविड संसर्ग रिपोर्ट पॉझिटिव्ह (Covid 19 Reports Positive) आले असून, त्यांचा संपर्क ओमायक्रॉन बाधित प्रवाशांशी (Omicron Obstructed Passengers) झाल्याची माहितीही समोर आली आहे.ओमायक्रॉनचे भय आता पोहोचले गोव्यात५ ओमायक्रॉन बाधित संशयित आढळून आल्याने गोवेकारांच्या चिंतेत भर पडलीये. केपटाऊन शहरातून (Cape Town City) निघालेल्या नेव्हल मर्चंटच्या बोटीत (Naval Merchant's Boat) असलेले हे पाचही जण ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कात आले होते. यात रशियन (Russian) व २ जॉर्जियन (Georgian) नागरिकांचा समावेश आहेत.पाचही प्रवाशी परदेशी- आरोग्यमंत्री राणेगोव्यात दाखल झालेले हे पाचही पर्यटक परदेशी असून, त्यांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ओमायक्रॉनच्या संशयावरून त्यांना कांसावली प्राथमिक आरोग्य केंद्रात विलीगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांचे रिपोर्ट पुण्यातील जेनोमा सिक्वेसिंग प्रयोगशाळेत (Genome Sequencing Laboratory in Pune) पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी दिली. गोव्यात कोरोनाचा धोका वाढतोयकोरोनाचे ३० ते ३५ रुग्ण आढळून येत असून, त्यामुळे राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 450 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांहून कमी आहे. आगामी ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागताला (Christmas and New Year's Celebration's in Goa) अनेक देशी, विदेशी नागरिक गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे हा धोका अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.