देशात इलेक्ट्रिक महामार्ग उभारण्याचा प्रयत्न करणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - सोलापूर अक्कलकोट महामार्ग लोकार्पण नितीन गडकरी
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - सोलापूर अक्कलकोट महामार्गाचा लोकार्पण ( Nitin Gadkari inaugurate Solapur Akkalkot Highway ) सोहळा सोमवारी 25 एप्रिल रोजी सोलापूर शहरात ( Solapur Akkalkot Highway news solapur ) आयोजित करण्यात आला होता. 164 कोटी रुपये खर्च करून सोलापूर अक्कलकोट असा 42 किमी महामार्ग ( Solapur Akkalkot Highway inauguration ) तयार झाला आहे. याचे लोकार्पण काल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला. व्यासपीठावर बोलताना त्यांनी इलेक्ट्रिक वाहन वापरण्यावर अधिक भर दिला. ऊस कारखानदारांना उसापासून इथेनॉलचा अधिक उत्पादन करा, असा सल्ला देखील दिला. भविष्यात सोलापूरसह इतर ठिकाणी इलेक्ट्रिक मार्ग ( Nitin Gadkari on electric highway in Solapur ) उभे करू. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक रेल्वे, इलेक्ट्रिक रोपवे चालतात त्या धर्तीवर इलेक्ट्रिक वायरीच्या आधारे बसेस, किंवा डबल डेकर बसेस चालतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.