Nana Patole In Amravati : बेबी केअर सेंटरला आग लागल्याची समजताच नाना पटोले आले धावून - नाना पटोले
🎬 Watch Now: Feature Video
जिल्हास्तरीय रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग (fire broke out at baby care center) लागल्याची माहिती मिळताच आज अमरावती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने धावून (Nana Patole baby care center) आलेत. पाच जिल्ह्यांसाठी एकच पालकमंत्री असल्याने कुठल्याही जिल्ह्याचा योग्य विकास आणि नियोजनात्मक कार्य होऊ शकत नाही, असे देखील नाना पटोले (Nana Patole In Amravati) म्हणाले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान बाळांची तातडीने काळजी घेऊन त्यांचे प्राण वाचवले याबाबत नाना पटोले यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले. नाना पटोले यांच्यासोबत जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर डॉ.सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसचे शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.