Chess Olympiad : ग्रँडमास्टर दिव्या देशमुखची बुद्धिबळ ओलिम्पियाडसाठी भारतीय संघात निवड - दिव्या देशमुखची बुद्धिबळ ओलिम्पियाडसाठी भारतीय संघात निवड
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - चेन्नई येथील महाबलीपुरम येथे आयोजित होणाऱ्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघाच्या 'ब' गटात नागपूरची कन्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुखची निवड ( Divya Deshmukh ) झाली आहे. 28 जुलै पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पाच वेळचे विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद ( World Champion Viswanathan Anand ) यांना भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून नियुक्त करण्यात आल्यामुळे भारतीय बुद्धिबळ खेळाडूंना विश्वनाथन आनंद यांच्याकडून डावपेच शिकण्याची संधी मिळणार असल्याने दिव्या देशमुख फारचं उत्साही झाली आहे. या आधी सुद्धा दिव्याला विश्वनाथन आनंद यांच्याकडून बुद्धिबळाचे धडे मिळाले आहेत.
दिव्याला भारतीय संघाच्या 'ब' गटाची कर्णधार म्ह्णून निवडण्यात आले आहे. तिच्या सोबत वंतीक अग्रवाल, सौम्य स्वामिनाथन, मेरी गोम्स, आणि पद्मिनी राऊत या खेळाडूंचा समावेश आहे. दिव्याला बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी स्पर्धेसाठी निवड होण्याचा पूर्ण विश्वास होता,दिव्याने तिच्या खेळातील उत्कृष्ट कामगीरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. भारतीय संघात निवड झाल्याची बातमी मिळाल्यापासून दिव्याला अभिनंदनासाठी फोन येत असले तरी ती मात्र स्पर्धेसाठी सराव करण्यात मग्न झाली आहे.