Junnar Muslim Morcha : जुन्नरमध्ये नुपूर शर्मा विरोधात शिया मुस्लिम समाजाच्यावतीने मोर्चा - नुूपूर शर्मा विरोधात जुन्नरमध्ये मोर्चा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून राज्यभरात जोरदार निदर्शने सुरू आहेत. आज ( शुक्रवारी ) पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिया मुस्लिम समजाच्यावतीने मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारच्या नमाज पठाण नंतर भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सय्यद वाडा ते जुन्नर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला. यावेळी शिया मुस्लिम समजाच्या वतीने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.