Video : 'कोणीतरी एक भंगार म्हणाला..', उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा.. म्हणाले, 'समजून बोला, नाहीतर..' - महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - मावळे असतात म्हणून राजे असतात, असे वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Statement On Raje Mavle ) यांचा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार ( Udayanraje Bhosale Criticized Sanjay Raut ) घेतला. राज्यात आता कुठल्या कुस्त्या चालल्यात ते मला माहित नाही. पण, ज्या चालल्यात त्या खर्या कुस्त्या नाहीत. चिल्लर कुस्त्या आहेत, अशा शब्दांत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेल्या घडामोडींवर टोला ( Udayanraje On RS VP Elections ) लगावला. सातार्यातील स्पर्धेत महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज पाटील ( Maharashtra Kesari Prithviraj Patil ) याला बुलेट गाडी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर परखड मते मांडली. वेडेवाकडे बोलू नका. जरा जपून बोलत जा. नाही तर श्वास कसा रोखायचा, हे दाखवून देऊ. समाजामुळे आम्ही आहोत, असे मी नम्रपणे मानतो. बोलण्यासारखे फार आहे, पण ही वेळ नाही. बोलण्यापेक्षा करून दाखविण्याचीच वेळ आली आहे. ज्यांची लायकी नाही, त्यांना वाटते आपण महान आहोत. पण, यापुढे जर कुणी बेताल वक्तव्य केले तर आम्ही सुध्दा कमी पडणार नाही, असा इशाराही खा. उदयनराजेंनी खा. संजय राऊत यांचा नामोल्लेख टाळून दिला.