राज ठाकरेंच्या भेटीसाठी कार्यकर्त्याची अक्कलकोट ते मुंबई पायी वारी, आज पुण्यात मनसेकडून स्वागत - Nagesh Kumbhar going mumbai by walking

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 16, 2022, 2:29 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वास्थ आणि दिर्घायुष्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी अक्कलकोट येथील नागेश कुंभार हा मनसेचा कार्यकर्ता अक्कलकोट ते मुंबई पायी निघाला आहे. आज तो पुण्यात आला असून, पुणे शहर मनसेतर्फे त्याचा स्वागत करण्यात आल आहे. अक्कलकोट येथील नागेश कुंभार हा अक्कलकोट येथून 9 जून रोजी पायी वारी करत मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नागेश हा ट्रक ड्रायव्हर असून तो जेव्हा सुरवातीला निघाला तेव्हा तो दररोज 50 कि.मी पायी चालायचा आणि मग तीन ते चार दिवसानंतर तो दररोज 30 कि.मी पायी चालला आहे. नागेश हा आज पुण्यात पोहचला असून यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत केले. नागेशने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दर्शन घेत राज ठाकरे यांच्या आरोग्यासाठी बाप्पा चरणी प्रार्थना केली. मी राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक असून मी प्रत्येक वेळी जिथे जिथे राज ठाकरे यांची सभा असेल तिथे तिथे गेलो आहे. पण, मी कधीही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही. त्यांना मी माझे विठ्ठल मानतो. आणि जसे विठ्ठलासाठी पायी वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतल जाते, तसे मी माझ्या विठ्ठलासाठी पायी वारी करत मुंबईच्या दिशेने निघालो आहे. मी एकादशीला माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे, असे यावेळी नागेश कुंभार याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.