Raj Thackeray PC Video : 'आम्हाला शांतता बिघडावयची नाही, जर हे भडकावायचे असते तर औरंगाबादेत...' - Raj Thackeray PC On Mosque Loudspeaker Issue
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्य सरकार जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन करत नसेल तर सुप्रीम कोर्ट काय करत आहे, हेही आम्ही पाहाणार आहोत. असे राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले. जेव्हा निवेदनाची भाषा समजत नाही, तेव्हा आंदोलनाची भाषा सुरु होते, असे म्हणत राज ठाकरे यांनी जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाही तोपर्यंत हनुमान चालीसाचे आंदोलन सुरुच राहाणार असल्याचे म्हटले आहे. आम्हाला दंगली घडवायच्या नाहीत. आम्ही पोलिसांना समजावून सांगत आहोत. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे. आमची इच्छा महाराष्ट्राची किंवा देशाची शांतता बिघडावयची नाही. औरंगाबादेत भाषणाच्या वेळी अजान ( Raj Thackeray on Aurangabad Shabha Azan Issue ) झाली त्यावेळी आम्ही पोलिसांना सांगितले. जर आम्हाला शांतता बिघडवायची असती तर त्या ठिकाणी काय प्रकरण झाले असते, असे राज ठाकरे म्हणाले. सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कारवाई होत आहे, की नाही हे आम्ही पाहात आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले. जिकडे लाऊडस्पीकर लावला जाईल टिकडे आम्ही हनुमान चालीसा त्यापेक्षा दुप्पट आवाजात वाजवू असा इशाराही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत ( Raj Thackeray PC On Mosque Loudspeaker Issue) दिला.