Ratnagiri News : रामदास कदमांच्या विरोधात शिवसैनिकांना भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न - आमदार योगेश कदम - रामदास भाईंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी : रामदास कदमांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास ( distortion of Ramdas Bhai's statement ) केला जात आहे, त्या वाक्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. राज्यामध्ये होत असलेलं राजकारण पाहून मुद्दामहून रामदास कदमांच्या विरोधात शिवसैनिकांना भडकवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न (Attempt to incite Shiv Sainiks against Ramdas Bhai ) आहे, अशी प्रतिक्रिया रामदास भाई कदम यांचे सुपुत्र आणि खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
रामदास कदमांनी काय केले होते वक्तव्य : आमदार रामदास कदम म्हणाले होते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ तीनवेळा गेले. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजत बसायचे. रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या.असा सणसणीत आरोप रामदास कदम यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर शिवसैनिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आल आहे.
यावेळी योगेश कदम म्हणाले : महाराष्ट्रात शिवसेना वाढविण्यात रामदास कदमांचा जो सिंहाचा वाटा ( Ramdas Bhai share in growth of Shiv Sena in Maharashtra ) आहे, तो शिवसैनिक विसरणार नाहीत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला शिवसैनिक हा रामदास कदमांना चांगला ओळखतो, ते रोखठोक बोलणारे आहेत. त्यामुळे बाळासाहेब आणि माँ साहेबांच्या बाबतीत कुठलाही वाईट विचार रामदास कदमांच्या डोक्यामध्येदेखील नाही. त्यामुळे मुद्दामहुन या वाक्याचा विपर्यास करून, चुकीचा अर्थ लावून जनतेसमोर दाखवाचा आणि रामदास कदमांची बदनामी करायची याचा मी निषेध करतो, असं योगेश कदम यावेळी म्हणाले.