महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राची प्रगती करत कार्यकाळ पूर्ण करणार - अस्लम शेख - minister aslam shaikh on one year
🎬 Watch Now: Feature Video
महाविकास आघाडी सरकारला २८ डिसेंबरला वर्ष पूर्ण होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष सत्तेत आल्यानंतर राज्यात कशा प्रकारे विकासाचे राजकारण केले, कोरोना काळातून सावरत राज्याला प्रगतीवर घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कशा पद्धतीने सक्षम आहे, या सारख्या अनेक विषयावर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आणि मत्स, वस्त्र उद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी संवाद साधला आहे.
मंत्री शेख म्हणाले, महिला अत्याचारावर विरोधक सध्या राजकारण करत आहेत, मात्र, आम्ही उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला नाही, तर आम्ही कारवाई केली आहे. तसेच आघाडीत बिघाडी नसून आमचे सरकार व्यवस्थित चालू आहे. सगळ्याकडे वेगवेगळ्या खात्याचा कारभार आहे. त्यामुळे काही अडचणी नाहीत. काही ठिकाणी निधी कमी मिळत आहे, यावर तो आमचा तीन पक्षांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुस्लीम आरक्षणाचा आमची मागणी आहे, पण सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही शेख म्हणाले, सरकार पाडण्यासाठी विरोधक टीका करत आहेत. मात्र, त्याच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत नाही, हे सरकार महाराष्ट्राची प्रगती करत पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी यावर्ष पूर्तीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
Last Updated : Nov 27, 2020, 4:41 PM IST