MIM massive Protest : एमआयएमच्या विराट मोर्चामुळे सोलापुरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत - सोलापूरच्या लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर: भारतीय जनता पार्टीच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ( Nupur Sharma and Naveen Jindal ) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीने मोठा भव्य विराट मोर्चा ( Protest on behalf of MIM in Solapur ) काढण्यात आला. शुक्रवारच्या नमाज पठणानंतर अनेक मुस्लिम लोकांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव जमेल याची कल्पना देखील नसल्याने, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक मशिदीत आवाहन केल्याने नमाज पठण झाल्यानंतर मशिदीतून सर्व जमाव थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून आला.
दोन दिवसांपासून सोलापुरात सोशल मीडियावर मोर्चा बाबत आवाहन करण्यात येत होते. शुक्रवारी दुपारच्या नमाजनंतर हळूहळू मुस्लिम तरुण एमआयएमच्या मुख्य कार्यालय येथे जमा झाले. हजारोंच्या संख्येने मोठा जमाव जमा झाल्यानंतर ही गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेली. पासपोर्ट ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण मार्गावर फक्त तरुणांची गर्दी होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
Last Updated : Jun 10, 2022, 10:35 PM IST