Telangana Child Marriage : वाढदिवसाच्या नावाखाली आईवडिलांनी 12 वर्षीय मुलीचा लावला 35 वर्षीय युवकाशी विवाह - तेलंगाणा बालविवाह
🎬 Watch Now: Feature Video
रंगारेड्डी (तेलंगाणा) - जिल्ह्यातील केशमपेट मंडळाच्या पापिरेड्डी गुडा गावात बालविवाह झाला ( Child Marriages in Telangana State ) होता. आई-वडिलांनी आपल्या 12 वर्षांच्या मुलीचे लग्न 35 वर्षांच्या पुरुषाशी लावले. इल्लम्मा आणि गोपाल हे जोडपे भटके जीवन जगून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. त्यांना 12 वर्षांची मुलगी आहे. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न फारुख नगरमधील वेलीजरला गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीशी लावले. वाढदिवसाचे सेलिब्रेशन असल्याचे सांगून तिच्या पालकांनी हे लग्न पार पाडले. लग्न करण्याची इच्छा नसलेल्या मुलीने गावकरी आणि आयसीडीएस कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यावरून ही घटना उघडकीस आली. ही बाब कळताच आयसीडीएस अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला पाठवले. या घटनेचा तपास केशांपेठ पोलीस करत आहेत.