CCTV Video : कौटुंबिक वादातून एकाचा पायच छाटला; मालेगावातील घटना - तलवारीने हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - मावस भावाच्या काैटूंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला ( Sword attack ) केला आहे. एकाने उजव्या पायावर तलवारीने वार केल्याने घाेट्याखालून पाय छाटला गेला आहे. माेहंमद राशिद असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे अडीच वाजता मालेगावातील ( Malegaon Crime ) लब्बैक हाॅटेलच्या पाठिमागे घडला. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला असला तरी संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत.