Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता जाण्याचे योग, तर देवेंद्र फडवणीसांना उच्च पद; महंत म्हणतात... - देवेंद्र फडवणीस मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांच्या जन्म कुंडली नुसार सिंह रास आहे. त्यानुसार त्यांचे 20 जुलै पर्यंत ग्रहमान खराब आहेत. 9 पैकी 5 ग्रहांच्या अवकृपेमुळे सर्वारिष्ट मतिभ्रम योग होत असून, मुख्यमंत्रीपद, सत्ता हातातून जाण्याचे प्रखर योग आहेत. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या जन्म कुंडली नुसार कुंभ रास आहे. त्यांना शनि व गुरूची विशेष अखंड कृपा होत आहे. त्यांना उच्चपद प्राप्त होईल. तसेच, येणारे दोन महीने राष्ट्रासाठी अतिशय चिंताजनक युद्ध जन्य परिस्थिती व निसर्ग प्रकोप आदी घटनांनाचे पण अनुभव येतील. राहू व केतूच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, असं महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी म्हटलं आहे.