महाराष्ट्र अर्थसंकल्प : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार - श्रीनिवास खांदेवाले
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी भरीव तरतूद करावी अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. त्यामुळे रुळावर येणारी अर्थव्यवस्था पुन्हा डिरेल होईल का? अशी भीती व्यक्त होत असताना दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अवहाल सादर केला. यात राज्यातील उद्योग, सेवा अशा सर्वच क्षेत्रांत कोरोनामुळे घट झालेली आहे. मात्र एकट्या कृषी क्षेत्रात ११.७ टक्के वाढ झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालात समोर आलंय. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार असल्याचे दिसत आहे.
Last Updated : Mar 8, 2021, 10:51 AM IST