Leopard In Amravati : विद्यापीठ परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ - अमरावतीत बिबट्या सीसीटीव्हीत कैद
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात गत अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यातच आता शुक्रवारी ( 1 जुलै ) पहाटे विद्यापीठात लगत असणाऱ्या गुरुकृपा कॉलनी येथील दादाराव चांदणे यांच्या घराच्या आवारात बिबट शिरला. घराच्या आवारात बिबट शिरल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. घरापर्यंत बिबट पोचल्यामुळे विद्यापीठ लगतच्या परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुकृपा कॉलनी परिसरात दादाराव चांदणे यांच्या घराच्या फाटकाजवळ अनेक वेळ बिबट फिरत होता. घराच्या कुंपणाची भिंत ओलांडून या बिबट्याने घराच्या आवारात प्रवेश केला. यावेळी दोन कुत्रे बिबट्या मागे धावल्यामुळे त्याने फाटकावरुन उडी मारुन थेट रस्ता ओलांडला. अन् विद्यापीठाच्या भिंतीवरुन उडी मारुन पसार झाला ( Leopard seen in university area in amravati ) आहे.