Leopard Attack : रस्त्याने जाणाऱ्या सायकलस्वारावर बिबट्याचा हल्ला, पाहा व्हिडिओ - आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्याना
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15559592-781-15559592-1655213916761.jpg)
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ बिबट्याच्या हल्ल्यातून एक व्यक्ती थोडक्यात बचावली. ही घटना सीसीटीव्हीत कैद ( Leopard attack captured on CCTV ) झाली आहे. हळदीबारी कॅटल कॉरिडॉरच्या बाजूला एका सायकलस्वारावर बिबट्याने हल्ला ( Leopard attack on cyclist ) केला. सुदैवाने त्याचा जीव वाचला. वास्तविक, आसाममधील अनेक भागात पूर आला आहे. अशा परिस्थितीत काझीरंगा ते कार्बियांगलाँगकडे लोकांची ये-जा वाढली आहे. सायकलस्वारांपासून ते दुचाकी, चारचाकी वाहनेही येथून जात आहेत. हा जंगली भाग असल्याने अनेकदा प्राणी रस्त्यावर येतात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे ( Kaziranga National Park ) डीएफओ रमेश कुमार गोगोई यांनी प्रवाशांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात वाहने थांबवू नयेत असे आवाहन केले आहे. सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.