कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना - bjp
🎬 Watch Now: Feature Video
कोकण म्हटलं की राणे असंच समीकरण होत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राणेंची ताकद कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे. कणकवली देवगड मतदारसंघातून भाजपकडून नितेश राणे हे रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात राणेंचेच कट्टर समर्थक असणारे सतिश सावंतांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे. काँग्रेसनेही येथून सुशिल राणेंना तिकीट दिले आहे. जरी येथील लढत तिरंगी होत असली तरी खरा सामना हा राणे विरुद्ध सेना असाच आहे.