Rajyasabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांच्या निधी वाटपाचा प्रश्न गाजणार?
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - राज्यसभा निवडणूक सुरू असताना राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता अपक्ष आमदारांचे महत्त्व वाढले असून घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात रामटेक मतदार संघाचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनीही निधी वाटपाच्या वरून गंभीर आरोप करत लक्ष वेधले आहे. अपक्षांसह अनेक आमदारांना आज मुख्यमंत्री यांनी मुंबईत बोलावले असून निधी वाटपावरून डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हा मुद्दाही आता चर्चेत येणार आहे. निधी देण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्री हे वेगळ्या पद्धतीने पैशाची मागणी करत असल्याचा आरोप होत आहे.