IND vs WI 5th T20 : भारतीय चाहत्यांनी 'ऊ अंटावा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ - cricket news
🎬 Watch Now: Feature Video
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs WI T20 Series ) संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 88 धावांच्या मोठ्या फरकाने विजय ( India won by 88 Runs ) मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 188 धावा केल्या. अमेरिकेच्या मैदानात ही धावसंख्या फारशी अवघड नव्हती, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना भारताची फिरकी गोलंदाजी खेळता आली नाही आणि 15.4 षटकांत 100 धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. सर्व 10 विकेट भारताच्या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. या सामन्यात रोहित शर्मा खेळत नव्हता आणि हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवले होते. त्याचवेळी रोहित मॅचदरम्यान ( Captain Rohit Sharma ) खूप मस्ती करताना दिसला. प्रथम रोहितने आपला सामना सोडून मोबाईल फोनवर महिला संघाचा सामना पाहिला. यानंतर पदक घेण्यासाठी आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ग्राऊंड स्टाफच्या गाडीत बसून मजा आनंद लुटला. या सामन्यादरम्यान चाहत्यांनी ऊ अंटावा या गाण्यावर जोरदार डान्स केला. पुष्पा चित्रपटाचे हे गाणे अमेरिकेतही खूप लोकप्रिय आहे आणि इथेही चाहत्यांनी या गाण्यावर जोरदार डान्स ( Indian fans dance to song 'Oo Antava' ) केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.