PM Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा निर्विघ्नपणे पार पडेल - गृहमंत्री - PM Narendra Modi Mumbai Tour
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतल्या त्यांच्या खार येथील निवास्थानी आहेत. त्यांनी आज सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीस वाचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांना घराबाहेर निघता आले नाही. दरम्यान, आता हे आंदोनल मागे घेत असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) मुंबईत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्यात कायदा सुरक्षेला धोका नको म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तद्पूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा निर्विघ्नपणे पार पडेल ( PM Narendra Modi Mumbai Tour ).