High Tide In Mumbai : समुद्राला भरती! साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता - समुद्रात उंच लाटा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला ( Heavy Rain In Mumbai ) सुरुवात झाली आहे. खास करून मुंबई उपनगर भागामध्ये पावसाचा जोर पहाटेपासून जास्त असलेला पाहायला मिळाला. जोरदार पावसाळ्याच्या सुरुवातीसोबतच आज साडेअकराच्या सुमारास समुद्रात भरती ( High Tide ) देखील येणार आहे. यावेळी साडेचार मीटर पर्यंतच्या लाटा समुद्रात उसळू शकतील ( High waves ) अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे समुद्राच्या जवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यास अडचणही होत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी.