Dasara Melava and Devi Visarjan दसरा मेळावा आणि देवी विसर्जनानिमित्त नवी मुंबईत जडवाहनांना प्रवेशबंदी - नवी मुंबईत वाहनांना प्रवेशबंदी
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा तसेच आज आणि उद्या होणारे दुर्गादेवींच्या मूर्तींचे Entry ban for heavy vehicles in Navi Mumbai विसर्जन. यामुळे नवी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अपॆक्षित वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक विभागाने नवी मुंबईत आज आणि उद्या अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली आहे. आज शिवसेना आणि शिंदे गटाच्या शेकडो बस मुंबईच्या दिशेने दसरा मेळाव्यासाठी निघणार आहेत. त्यातच अनेक नवरात्रौउत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन देखील होणार आहे. दसरा आणि विसर्जन मिरवणुका Dasara Melava and Devi Visarjan यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरातील नागरिकांना रस्त्यांवरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा. यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी तिन्ही शहरांच्या हद्दीतून आपत्कालीन सेवा वगळता अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली Entry ban for heavy vehicles in Navi Mumbai आहे. तसेच कोणतेही अवजड वाहन रस्त्यावर उभे करू नये. असा आदेशही जारी करण्यात आला. असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे.