मुंबईतील दहिसर, अंधेरी, सांताक्रुज, खारसह 'या' भागांमध्ये मुसळधार पाऊस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 5, 2022, 1:09 PM IST

मुंबई - मुंबई, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जगमेश्वरी, अंधेरी, खार, सांताक्रुज, विलेपार्ले, दादर, बांद्रामध्ये ( Heavy rains in Borivali Kandivali Malad Goregaon ) मुसळधार पाऊस कोसळला आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असताना राज्यासाठी ( Heavy rains in some parts of Mumbai ) पुढचे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पुढचे पाच महाराष्ट्र, मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबई उपनगर भागात ऑरेंज अलर्ट ( Heavy rains in Jagmeshwari Andheri ) जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज मराठवाड्यातील काही भागांत 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात 6 व 7 जुलै रोजी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.