Heavy rain in Pune पुण्यात परतीचा पाऊस धो-धो बरसला.. विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसात, पाहा व्हिडिओ - परतीचा पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
पुणे परतीच्या पावसाला सुरवात झाल्यापासून पुण्यासह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरोरोज पुणे शहरात पाऊस होत असून दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रीच्या वेळेस पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात Heavy rain in Pune झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ सदाशिव पेठ स्वारगेट नवी पेठ यासह कात्रज कोंढवा कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. आज दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाला रात्री ९ वाजता अचानक सुरूवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला rain in Pune मिळाली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक मंदावली आहे तर दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्याची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पुढील 2 ते 3 दिवस अश्याच पद्धतीने अचानक जोरदार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचा जोर हा कमी कमी होत जाणार आहे. अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली Heavy rain in Pune with sound of thunderbolts आहे.