Ganeshotsav Mumbai 2022 मुंबईच्या रस्त्यांवर गणेशोत्सवाची धूम, ढोल ताशाच्या गजरात बाप्पाच्या आगमनाला सुरुवात - गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाला Ganeshotsav Mumbai 2022 आता अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक राहिले आहेत. अशात मुंबईतील गणेश मूर्तिकारांच्या कारखान्यातून गणपती बाप्पाच्या विविध रूपांतील मूर्ती आप आपल्या मंडपात जायला निघाल्या आहेत. विविध रुपांतील १२ फूट पासून २४ फूटापर्यंत मूर्ती दक्षिण मुंबईतील रस्त्यावर पाहायला मिळाल्या. लालबागचा सम्राटपासून खेतवाडीचा लंबोदर या सर्व विशालकाय मूर्ती ढोल ताशाच्या गजरात आज निघाल्या. हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी मुंबईतील रस्त्यावर गणेश भक्तांची अलोट गर्दी दिसून आली.