Gajanan Maharaj Palkhi: गजानन महाराजांच्या पालखीचे जालन्यात उत्साहात स्वागत - Gajanan Maharaj Palkhi
🎬 Watch Now: Feature Video
जालना - शेगाव श्री गजानन महाराज संस्थान न्यासाच्या श्रींच्या पालखीचे आज रविवार (दि. 24 जुलै)रोजी जालना शहरात आगमन झाले. शेगाव येथून (६ जून)ला निघालेली दिंडी (८ जुलै)रोजी पंढरपूरमध्ये पोचली होती.आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या या पायी दिंडीचे आगमन आज जालना शहरातील अंबड चौफूली भागात झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या भक्तीती भावाने पालखीचे दर्शन घेतले. पालखी सरस्वती भुवन हायस्कूल मार्गे जुना जालना शहरात आज मुक्कामी असणार आहे.