गेल्या 4 दिवसांपासून मुंबईला पावसाचा तडाखा, दादर आणि इतर भागांची जाणून घ्या परिस्थिती - जोरदार पाऊस मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मागील चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राला पावसाने जोरदार तडाखा दिला. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मुंबईकरांची दमछाक झाली. रात्रभर मुंबईत मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पाऊस नसला तरी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दादर, टिटी आणि वडाळा रोड येथे काय परिस्थिती आहे याचा आढावा ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतला.