Video : खड्ड्यात अडकले हत्तीचे पिल्लू, बेशुद्ध झालेल्या हत्तीणीला सीपीआरने आणले शुद्धीवर - हत्तीणीचे पिल्लू एका मोठ्या खड्ड्यात पडले

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jul 18, 2022, 1:11 PM IST

मध्य थायलंडच्या नाखोन नायक प्रांतातील खाओ याई नॅशनल पार्कमध्ये ( Khao Yai National Park ), पशुवैद्य, राष्ट्रीय उद्यान कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या पथकाने हत्तीच्या बाळाची आणि तिच्या आईची यशस्वीरित्या सुटका केली. उद्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षाचे हत्तीणीचे पिल्लू एका मोठ्या खड्ड्यात पडले ( baby elephant fell into the pit ) होते. त्यामुळे त्या पिल्लाची आई हत्तीण पिल्ला न सोडता पहारा देत होती. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि हत्तीला काबूत आणण्यासाठी भूल देण्याच्या गोळ्या वापरल्या, परिणामी ती बेशुद्ध पडली. तिचे अर्धे शरीर खड्ड्यात आणि अर्धे बाहेर होते, अशा प्रकारे ती तिथेच बेहोश झाली. त्यानंतर रेस्क्यू टीमने आईला उचलण्यासाठी क्रेनचा वापर केला आणि तिला कसेबसे बाहेर काढण्यात आले. यानंतर क्रेनच्या साहाय्याने हत्तीच्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यानंतर ते पिल्लू स्वत:च बाहेर आले. या हृदयद्रावक दृश्याच्या व्हिडिओमध्ये बचाव पथकाचे सदस्य हत्तीला वाचवण्यासाठी सीपीआर ( Cardiopulmonary Resuscitation ) करताना दिसतात. दरम्यान, खड्ड्यातून बाहेर आलेले हत्तीचे पिल्लू आईकडे जाते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हत्तीण जागी होती आणि आपल्या पिल्लासह जंगलात जाते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.