Eknath Shinde : नागपुरात शिवसैनिक आक्रमक; एकनाथ शिंदे यांचा पुताळा जाळला - महाराष्ट्रात राजकीय संकट
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - शिवसेनेच्या बंडखोरीचे पाडसाद आता नागपुरातही पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांना मधला रोष ( Shiv Sainik aggressive ) समोर येऊ लागला आहे. नागपूरच्या रेशिंबाग चौकात ( Reshimbag Chowk ) जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. शिवसेना सोडून भाजपसोबत ( BJP ) जात असलेल्या बंडखोरांचा कृतीला शिवसैनिकांचा विरोध असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. कधीकाळी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमध्ये मान सन्मान मिळायचा. मात्र, आता त्यांचा पुतळा जाळून पुतळ्यांना लाथा हाणून त्यांचा निषेध केला जातोय. हे चित्र महाराष्ट्रभर सर्वत्र पहायला मिळत असून शिवसैनिक आता बंडखोरीच्या विरोधात संतप्त होताना दिसून येत आहे.
Last Updated : Jun 26, 2022, 8:30 PM IST