Devendra Fadnavis : तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडका, देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' सल्ला - Devendra Fadnavis

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 7, 2022, 2:02 PM IST

कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले राज्याचे नवनियुक्त आरोग्य सेवा आयुक्त Newly appointed Health Services Commissioner तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तुकाराम मुंढे National Health Mission Director Tukaram Mundhe ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. सार्वजनिक आरोग्‍य सेवा Public Health Service अत्‍यावश्‍यक सेवा असल्याने शासकीय आरोग्‍य संस्‍था २४ तास कार्यरत राहतील. डॉक्टर आणि कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित नसल्यास तात्काळ निलंबन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीचे सत्र सुरू होणार आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की आरोग्य विभागात अकाऊंटीबीलीटी गरजेची आहे. सरकार बदललंय अकाउंटबीलीटी ठरली पाहिजे. प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी अस मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.