Video : आनंदाने बागडत असतानाच काळाने घातला घाला; कारच्या धडकेत झाला मृत्यू - Deer Video
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर : मंगळवेढा - सोलापूर महामार्गावर गुरुवार दि. 28 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अर्धनारी परिसरामध्ये महामार्गावर धावणाऱ्या हरणाला एका चार चाकी अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला ( Deer killed in collision with car ) आहे. आनंदाने बागडत असतानाच मृत्यूचा घाला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका हरणाचे पाडस अर्धनारी परिसरामध्ये आनंदाने बागडत होते. ते रस्त्यावर धावत असताना जाणारे प्रवासी त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होते. ते धावत असतानाच अचानक उडी मारून ते रस्त्याच्या पलीकडे गेले आणि सोलापूरहून - मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाच्या समोर आले. त्याला लागलेल्या जोराची धडकेत त्या पाडसाचा जागीच मृत्यू झाला ( Deer killed on Solapur highway ) आहे. धडक बसल्यानंतर जोराचा आवाज झाल्यानंतर नागरिक जमा झाले. परंतु तोपर्यंत चार चाकी वाहन निघून गेले होते.