Video : विद्यार्थ्यांचा पालघरमध्ये जीवघेणा प्रवास! शाळेसाठी ट्यूबच्या टायरने ओलांडली नदी - life threatening journey
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - नदीच्या वाहत्या पाण्याच्या धोकादायक प्रवाहावर टायरमधील ट्यूबच्या साहाय्याने शाळकरी विद्यार्थिनी प्रवास ( Students cross river by tyre tube ) करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. विक्रमगडमधील मलवाडा ग्रामपंचायत ( Malwada Gram Panchayat in Vikramgad ) हद्दीतील म्हसेपाडा गावातील ( MhsePada village ) हे विदारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. म्हसेपाडा या गावाला गारगाई आणि राखाडी ( Gargai and Rakhadi River ) या दोन्ही नद्यां पावसाळ्यात चारही बाजूनी वेढा ( Rivers covered village ) घालत असतात. त्यामुळे गावात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग या गावातील ग्रामस्थांना नाही. नदीवर एक छोटा बंधारा आहे, मात्र त्याची उंची कमी ( small height dam on the river ) असल्याने तो पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली असतो. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना वाहनाच्या टायरमधील ट्युबचा आधार घेऊन हा काही मीटर अंतराचा जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास ( life threatening journey ) करावा लागतोय. गारगाई आणि राखाडी या दोन्ही नद्यांचा प्रवाह अतिशय तीव्र असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक या विद्यार्थ्यांची नदीपत्रातून ट्यूबच्या साहाय्याने ये - जा करण्यासाठी मदत करतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून या गावाला जोडणाऱ्या पुलाची मागणी असताना देखील जिल्हा प्रशासनाने येथील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.