thumbnail

By

Published : May 22, 2021, 6:43 AM IST

Updated : May 22, 2021, 6:57 AM IST

ETV Bharat / Videos

बार्ज पी ३०५ दुर्घटना; अॅफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला पाहून काढला पळ

मुंबई - अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतरही पी-305 बार्ज समुद्रात होते. बॉम्बे हाय तेल क्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला ते जहाज बांधून ठेवण्यात आलं होते. पूर्व कल्पना असूनही वेळेत या बार्जला सुरक्षित ठिकाणी न हलवल्याने ही भयंकर दुर्घटना घडल्याचा आरोप आता होत आहे. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी संतप्त होत अॅफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्याला घेरले. मात्र त्यांना योग्य ती माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्याला ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी प्रश्न विचारले असता, या अधिकाऱ्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
Last Updated : May 22, 2021, 6:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.