नागरी वस्तीत सर्पमित्रांनी पकडला कोब्रा, बिळात सापडली २० अंडी, पाहा व्हिडिओ... - कराड सर्पमित्र बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कराड (सातारा) - कराड तालुक्यातील येरवळे गावात एका बंगल्याशेजारील बिळात २० अंडी घातलेल्या कोब्रा नागाला सर्पमित्रांनी थरारकरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. येरवळेतील जुन्या गावठाणातील महादेव विठ्ठल यादव यांच्या स्वप्नपूर्ती बंगल्याच्या भिंतीजवळ बिळामध्ये कोब्रा साप आढळून आला. त्याठिकाणी कोब्रा नागाची २० अंडीही आढळली. नागरी वस्तीत वारंवार कोब्रा नागाचे दर्शन होत होते. त्यामुळे जुन्या गावठाणातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण होते. महादेव यादव यांनी कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांना बोलावून घेतले. त्यांनी बिळात लपलेल्या कोब्रा नागाला तासाभराच्या प्रयत्नानंतर थरारकरित्या पकडून बरणीत बंद केले. त्यानंतर कोब्रा नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. कोब्रा नाग पकडताना येरवळे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.