मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महापालिकेच्या मुख्यालयात दाखल - Mumbai Rain Latest News
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पावसाचा जोर आणखी वाढला आहे. मुंंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीचा देखील सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचले आहेत.